पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभेची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच भाजप आपल्या ४०० पारच्या दाव्यापासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर ‘मिम्स’चा मारा सुरू व्हायला सुरुवात झाली. मतदानोत्तर चाचण्यांचे हुकलेले अंदाज हा सर्वाधिक चेष्टेचा विषय राहिला. ९ वाजता भांडवली बाजार उघडल्यानंतर झालेली पडझड हा आणखी एक चर्चेचा मुद्दा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पंचायत’सारख्या वेब मालिकांपासून ते ‘हेरा-फेरी’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ अशा अनेक चित्रपटांमधील चित्रे आणि दृश्यांचा पुरेपूर वापर नेटकरांनी केला. ‘वासेपूर’मधील पिस्तूल घेऊन बाईकवर निघालेल्या तिघांचे छायाचित्र वापरून ‘एक्झिट पोल घेणाऱ्यांच्या शोधात निघालेले..’ अशी टिप्पणी आहे. ‘पंचायत’ या गाजलेल्या मालिकेतील अनेक दृश्यांचा वापर मिम्समध्ये दिसला. मालिकेतील भूषण आणि बिनोद यांच्यातील ‘एक-एक चाय और हो जाए’ या दृश्याचे छायाचित्र वापरून ‘मी आणि माझे बाबा, निकाल बघताना..’ अशी मल्लिनाथी करण्यात आली आहे. तर यातील ग्रामपंचायत कार्यालयात बसलेल्या चौघांच्या छायाचित्रावर ‘निकालानंतर काय बोलावे, हे सुचत नसलेले काका’ असा टोला लगावण्यात आला आहे. भांडवली बाजारांतील पडझडीवरील ‘मिम’ची जोरदार चलती होती. ‘हम आप के है कौन’ या चित्रपटातील रेणुका शहाणेचा नाच आणि नंतर पायऱ्यांवरून खाली पडल्याची छायाचित्रे वापरून ‘शेअर बाजार : काल विरुद्ध आज’ अशी टोमणेबाजी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>उत्तर प्रदेशात भाजपचे गर्वहरण; दलितमुस्लीम आणि ओबीसींच्या पाठिंब्यामुळे ‘इंडिया’ची सरशी

याखेरीज, एकूणच निकालावर भाष्य करणारे मिम भरपूर प्रमाणात पसरल्याचे दिसले.  राज ठाकरे यांचे छायाचित्र वापरून ‘मी ज्या पंगतीला बसतो, नेमके तिथलेच जेवण कसे संपते..’ असा टोला लगावण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत आहेत आणि नितीश फोनकडे बघत आहेत, अशी दोन छायाचित्रे वापरून ‘नितीशजी फोन उचला.. ही चेष्टेची वेळ नाही,’ हा काल्पनिक संवाद मोदींच्या तोंडी देण्यात आला आहे. ‘वेलकम’ चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकरांचा फोन एकाच वेळी घेणाऱ्या मल्लिका शेरावतचे छायाचित्र वापरून भाजप, नितीश आणि काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.