बनावट पॅनकार्डचा सुळसुळाट रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग प्रत्येक अर्जदाराला जन्मतारखेचा पुरावा देणे बंधनकारक करण्याची शक्यता आहे. पॅनकार्ड काढण्यासाठी अर्ज करताना संबंधित अर्जदाराला आपल्या जन्म तारखेच्या पुराव्याची छायांकित प्रत देणे लवकरच बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर शिधापत्रिका किंवा भाडेपावती यापुढे निवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
काही नागरिक बनावट शिधापत्रिका किंवा भाडे पावत्यांच्या आधारे पॅनकार्ड काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच त्याचा वापर थांबविण्याचा विचार सध्या करण्यात येतो आहे. सध्या बॅंकेच्या खात्याचे विवरणपत्र, पासबुक, शिधापत्रिका, पारपत्र, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, मालमत्ता कराचे विवरणपत्र इत्यादी कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतात. यामध्ये लवकरच बदल करण्यात येणार असून, कागदपत्रांची पडताळणी करण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा