काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीवरून मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील पेट्रोलचे दर हे २५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदीसरकारवर टीका केली. पेट्रोलचे दर २५ रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर १ किंवा २ रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले.
It is possible to cut upto Rs 25 per litre, but the government will not. They will cheat the people by cutting price by Rs 1 or 2 per litre of petrol
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 23, 2018
गत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे २५ रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे १५ रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते १० रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.
Central government saves Rs 15 on every litre of petrol due to fall in crude oil prices. Central government puts additional tax of Rs 10 on every litre of petrol.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 23, 2018
दरम्यान, बुधवारी देशभरातील पेट्रोलच्या किंमती सकाळी ६ वाजता ३० पैशांनी वाढले. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल प्रति लिटरला ७६.८७ रूपयांपर्यंत पोहोचले. तर मुंबईमध्ये सर्वांत महाग ८४.९९ रूपयांमध्ये ते विकले जात आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली आहे. लवकरच जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला जाऊ शकतो.