विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं म्हणण्याचा अधिकार कुणालाही नाही. विधीमंडळात अनेक दिग्गजांनी काम केलं आहे. संजय राऊत हे जर तसं बोलले असतील तर ते चुकीचं आहे. विरोधक असो किंवा सत्ताधारी कुणीही समर्थन केलेलं नाही. संजय राऊत हे तसं बोलले असतील तर चौकशी केली जावी. कारण या वाक्याचं समर्थन होऊच शकत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.या संदर्भातला जो काही वेगळा निर्णय असेल तो घेतला जावा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष हक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे जाईल असा अंदाज दिसतो आहे. अजून हे तसं प्रकरण दिसत नाही. बुधवारपर्यंत याचा निर्णय देतो असं सांगितलं आहे. दोन दिवसांनी सांगतो सांगितल्यावर थोडा अंदाज चुकला आहे. विशेष हक्क समितीला बसावं लागेल. ज्यांच्या विरोधात दिलं आहे त्यांचं म्हणणं काय? त्यानंतर विशेष हक्क समिती निर्णय घेईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना शिंदे गटावर टीका केली. तसंच विधीमंडळाचा उल्लेख करत ते चोर मंडळ असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर टीका केली.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखं नाही. या विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असं विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is very wrong to call the vidhi mandal as chor mandal said ajit pawar scj