BJP Ex MLA Harvansh Singh Rathore IT raid: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्याचे भाजपाचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. राठोड यांचे व्यावसायिक भागीदार राजेश केसरवानी यांच्या बीडी उत्पादन करण्याच्या व्यवसायासंबंधी चौकशी सुरू असून यासंबंधी तपास करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने हरवंश सिंह राठोड यांच्या घरावर छापेमारी केली. यावेळी राठोड यांच्या घरात जे दिसले, त्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले. राठोड यांच्या घराच्या आवारात एका छोट्याश्या डबक्यात चार मगरी आढळून आल्या आहेत. यापैकी दोन मगरींना शुक्रवारी (दि. १० जानेवारी) तर उर्वरित दोन मगरींना शनिवारी वन विभागाच्या स्वाधीन केले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशच्या वन विभागाचे प्रमुख असीम श्रीवास्तव यांनी सांगितले की, प्राप्तीकर विभागाने माहिती दिल्यानंतर मगरींना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीनंतर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. मगरींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना धरणात सोडले जाईल. राठोड यांच्या घरातील मगरी नेमक्या कुणाच्या आहेत, यावर मात्र श्रीवास्तव यांनी भाष्य करणे टाळले आहे.

हे वाचा >> Kanpur Couple Video: जोडप्याचं दुचाकीवर नको ते कृत्य, रिल व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई

कोण आहेत हरवंश सिंह राठोड?

राठोड २०१३ साली सागर जिल्ह्यातील बंदा विधानसभेतून निवडून गेले होते. त्यांचे वडील हरनाम सिंह राठोड हे राज्याचे माजी मंत्री होते. केसरवानी यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्यामुळे रविवारपासून प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरू आहे, अशी माहिती पीटीआयच्या वृत्तात दिली आहे.

राजेश केसरवानी यांनी १५० कोटींची करचोरी केल्याप्रकरणी प्राप्तीकर विभागाची छापेमारी सुरू आहे. माजी आमदार राठोड आणि त्यांच्या भावाच्या घरातून काही प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. राठोड, केशरवानी आणि इतर भागीदारांची २०० कोटींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या सर्वांच्या घरातील छापेमारीनंतर १४ किलो सोने, तीन कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.