आयकर विभागाने हैदराबादमध्ये एका औषध निर्माण म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या छाप्यामध्ये एका कपाटात ५०० च्या नोटा आढळून आल्या असून ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या छाप्यादरम्यान सापडलेल्या या रोख रक्कमेचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

आयकर विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार ज्या कंपनीवर छापा टाकण्यात आला ती कंपनी परदेशात औषधं पाठवणारी कंपनी आहे. अमेरिका, युरोप, दुबई आणि आफ्रीकन देशांमध्ये या कंपनीने निर्माण केलेली औषधांची निर्यात केली जाते. छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक कपाट उघडलं आणि त्यांना समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला. एका मोठ्या कपाटामध्ये ५०० च्या नोटांचे अनेक गड्ड्या ठेवण्यात आल्याचं त्यांना दिसून आलं.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
One killed on suspicion of theft four arrested
ठाणे : चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, चौघांना अटक
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
Crime News
Crime News : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन मजुराची मारहाण करुन हत्या, गोरक्षा समितीच्या पाच सदस्यांना अटक
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

छापा टाकण्यात आलेली कंपनी ही हेटेरो फार्मास्युटिकल समुहामधील कंपनी असल्याचं सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने बुधवारपासून राज्यामधील ५० वेगवेगळ्या ठिकाणीनी छापेमारी केलीय. या छाप्यांमध्ये आयकर विभागाला खात्यांची माहिती असणारी पुस्तकं, डिजिटल उपकरणे, पेन ड्राइव्ह आणि बरीच कागदपत्रं हाती लागली आहेत. अनेक बनावट तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा काळापैसा लपवण्यासाठी व्यवहार झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलेलं. तसेच जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचेही पुरावे या छापेमारीमध्ये सापडले आहेत.

तपासादरम्यान कंपनीच्या नावे अनेक बँक लॉकर्स असल्याचं समोर आलं असून १६ लॉकर्स नियमीतपणे वापरले जात आहे. या छापेमारीमध्ये पैसे भरुन ठेवलेलं एक संपूर्ण कपाट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल नेटवर्किंगवर या कपाटाचे फोटो व्हायरल झालेत.

त्या लॉकरमध्ये कपडे असतील

दोन दोन हजाराच्या नोटा ठेवायच्या ना

कोणत्याही कंपनीत छापा टाकला तरी…

हे कपाट हवंय

नोटबंदीने काही झालं नाही…

नोटांची केवळ एक गड्डी द्या…

आयकर विभागाने या कंपनीचं नावं सांगितलं नसलं तरी हेटेरो फार्मास्युटिकल समुहामध्ये ही कंपनी असून याच समुहाने करोनाच्या उपचारावरील रेमडिसीवीरचं जेनरिक व्हर्जन बाजारात आणलं होतं.