Donald Trump massage : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज सकाळी पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे जीवघेणा हल्ला झाला. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘देवाची कृपा म्हणूनच मी वाचलो’, असे ट्रम्प म्हणाले. एवढेच नाही तर या हल्ल्यानंतरही आपण स्वस्थ बसणार नसून पुढल्याच आठवड्यात अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक्स या सोशल मीडिया साईटवरून गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ट्रुथ सोशल मीडिया वापरतात. या साईटवर टाकलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, या क्षणी आता आपण आणखी ताकदीने आणि एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. आपला दृढनिश्चय दाखवून देत अमेरिकन चरित्र काय असते, हे दाखविण्याची आता अधिक आवश्यकता आहे.

donald trump and joe biden meet at the white house
ट्रम्प-बायडेन यांच्यात दोन तास चर्चा; सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, ‘व्हाइट हाऊस’चे निवेदन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
s jaishankar on donald trump us president
“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका; म्हणाले, “ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन कॉलमध्ये…”!
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
america election
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हे वाचा >> Donald Trump Rally Firing : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न… हल्ल्यामागे कोण?

donald trump massage
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट टाकून पहिली प्रतिक्रिया दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या आहेत. आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणाले, “देवाची कृपा म्हणूनच आज वाईट प्रसंग घडला नाही. यातूनच दृष्ट शक्तींना जिंकू न देणे, ही आपली जबाबदारी आहे.” आज पेनसिल्व्हेनियामधील सभेला संबोधित करत असताना ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर रक्ताच्या धारा पाहायला मिळाल्या. ७८ वर्षीय ट्रम्प यांना यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा >> ‘ती’ गोळी ट्रम्प यांच्या डोक्याजवळून गेली; नव्या फोटोमुळं खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांचं निवदेन काय? (What Donald Trump Said?)

गोळीबाराच्या या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन समोर आलं आहे. “मी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. त्यांनी गोळीबारानंतर तातडीने कारवाई केली. रॅलीत ज्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशात असं कृत्य घडू शकतं यावर माझा विश्वास बसत नाही. हल्लेखोराबाबत मला तूर्तास काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यानंतर काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं आणि मी खाली वाकलो त्यामुळे माझा जीव वाचला.” असं ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

Donald Trump Shooting
प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार (फोटो – )

ट्रम्प यांच्यावरील हल्लेखोर कोण?

एफबीआयला हल्लेखोराची ओळख पटली असून थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) असे त्याचे नाव आहे. तो पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्क येथील राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने हा हल्ला का केला, त्याच्याबरोबर आणखी कुणी होते की तो एकटाच होता याचा तपास सुरू आहे. हल्लेखोर हा रिपब्लिकन पक्षाचाच नोंदणीकृत सदस्य असल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. पेनसिल्व्हेनियाच्या मतदार नोंदींनुसार याला दुजोरा मिळत असला, तरी अद्याप तपास यंत्रणा किंवा रिपब्लिकन पक्षाकडून तसे जाहीर करण्यात आलेले नाही. थॉमस क्रूक्स हा अमलीपदार्थांच्या आहारी गेला असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.