टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी पाच लोक टायटन या पाणबुडीत गेले होते. या पाणबुडीचा स्फोट झाला आणि पाचही जणांचा मृत्यू झाला. शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान या दोघांचाही या पाच जणांमध्ये समावेश होता. या घटनेनंतर आता शहजादा दाऊद यांच्या पत्नीने क्रिस्टीन दाऊदने या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. पाणबुडीचा शोध दोन दिवस सुरु होता पण या पाणबुडीचा स्फोट झाला.
क्रिस्टीन दाऊद यांनी काय म्हटलं?
“रविवारी या पाणबुडीचा संपर्क तुटला होता. माझी १७ वर्षांची मुलगी एलिना आणि मी आम्ही दोघंही शहाजादा दाऊद आणि सुलेमान परत येतील अशी वाट बघत होतो. पण ते दोघे परतले नाहीत. बीबीसीशी बोलताना क्रिस्टीन म्हणाल्या की पाणबुडीचा संपर्क तुटला याचा अर्थ काय? हे लक्षात यायला वेळ लागला.”
शाहजादा दाऊद हे त्यांचा मुलगा सुलेमानसह टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेले होते. त्यांचा पूर्ण प्रवास ८ तासांचा होता. मात्र पाणबुडीचा प्रवास सुरु झाल्यानंतरच काही वेळातच पाणबुडीचा संपर्क तुटला. या सगळ्या विषयी क्रिस्टिन म्हणाल्या आम्हाला वाटलं होतं की हे दोघं परत येतील. मात्र या पाणबुडीचा सापडण्याचा वेळ जेवढा वाढला तेवढी आमची चिंता वाढू लागली. त्यावेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
आम्ही समुद्राकडे पाहात होतो
क्रिस्टीन यांनी सांगितलं की टायटन पाणबुडी बुडाली तेव्हा सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हे दोघंही जिवंत असतील. आम्ही वारंवार समद्राकडे जायचो. ९६ तास जेव्हा पाणबुडीचा पत्ता लागला नाही. ९६ तास चालेल इतका ऑक्सिजन या पाणबुडीवर नव्हता. त्यानंतर मग मी माझ्या कुटुंबीयांना सांगितलं की आता तुम्ही वाईट बातमी ऐकण्याच्या तयारीत राहा. त्यानंतर ती ही वाईट बातमी आलीच. माझ्या मुलीने आशा सोडली नव्हती. तिला वाटत होतं की तिचे बाबा आणि भाऊ परत येतील पण तसं घडलं नाही.
मुलाऐवजी मीच त्या पाणबुडीत जाणार होते
क्रिस्टिन यांनी सांगितलं की पाणबुडीसह टायटॅनिकचे अवशेष बघायला मी जाणार होते. मी माझ्या पतीला हे सांगितलं होतं की तुम्हाला टायटॅनिकचे अवशेष बघायचे आहेत तर मी पण येते. मात्र मी गेले नाही आणि मग सुलेमान गेला. शहजादा दाऊद हे टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. ते खूपच खुश होते. माझा मुलगा सुलेमान ३७०० मीटर खोल समुद्रात रुबिक क्युबही घेऊन गेला होता. ते त्याला तिथे सोडवायचं होतं. दोघंही उत्साहात होते. पण ही दुर्घटना टळली.