परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ड्रामेबाज म्हणणाऱया कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले. कॅमेऱयासमोर बाईट देणे सोनिया गांधींसाठी सोपे आहे. मात्र, कागदावर लिहिलेले वाचल्याशिवाय त्यांना भाषणच करता येत नसल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांना ड्रामेबाज म्हणणे म्हणजे जनादेशाचा अवमान करण्यासारखे आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणात सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप गुरुवारी फेटाळून लावले होते. ललित मोदी यांना मदत केल्याचा एकतरी पुरावा विरोधकांनी आणून द्यावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. नाटक करण्यात सुषमा स्वराज पटाईत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणावरून सुषमा स्वराज नाटक करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यावर स्मृती इराणी यांनी सुषमा स्वराज यांची बाजू उचलून धरत सोनिया गांधींवर टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2015 रोजी प्रकाशित
कॅमे-यांसमोर बाईट देणे सोनिया गांधींसाठी सोपे – स्मृती इराणींचा पलटवार
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ड्रामेबाज म्हणणाऱया कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले.

First published on: 07-08-2015 at 04:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its easy for soniaji to give a byte criticizes smriti irani