पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एका चित्रकाराने रेखाटलेल्या चित्रांच्या विक्रीमूल्यावर केलेल्या वक्तव्यावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी, नाहीतर त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करू असा इशारा तृणमूल काँग्रेसने दिला आहे.
तृणमूल काँग्रेसचे सचिव मुकूल रॉय म्हणाले की, “एकतर त्यांनी केलेले वक्तव्य सिद्ध करून दाखवावे किंवा जाहीररित्या माफी मागावी नाहीतर आम्ही त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करू.”
नरेंद्र मोदींनी आपल्या जाहीर सभेत, “ममता बॅनर्जी यांचे एका चित्रकाराने रंगविलेल्या छायाचित्रांची पश्चिम बंगालमध्ये ४ लाख, ८ लाख किंवा १५ लाखांपर्यंत विक्री करण्यात येते. परंतु, तुमचे एक छायाचित्र तब्बल १.८० कोटींना विकले गेले यामागचे नेमके कारण काय? मी कलेचा आदर करतो, पण १.८० कोटींना चित्र विकत घेणारा व्यक्ती कोण?” असे वक्तव्य केले होते.
मोदींच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसने कठोर भूमिका घेत मोदींनी माफी न मागितल्यास बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मोदींनी केलेले आरोप आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असून याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मुकूल रॉय यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा