अमेरिकेतील सिएटलमधील नॉर्थईस्टर्न विद्यापीठाच्या आवारात एका भारतीय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला होता. सिएटल शहरात विद्यापीठाच्या बाहेरच्या रस्त्यावर २३ जानेवारी २०२३ रोजी हा अपघात झाला होता. पोलिसांचं पथक गस्तीवर असताना पोलिसांच्या एका कारने रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. जान्हवी कंडुला असं या विद्यार्थिनीचं नाव होतं. तर केव्हिन डव्ह हा पोलीस कर्मचारी त्यावेळी कार चालवत होता. सिएटल पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, तपास यंत्रणेला एक व्हिडीओ मिळाला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा अपघात झाल्यानंतर केव्हिन डव्हने पोलीस मुख्यालयाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर मुख्यालयाने सिएटल पोलीस अधिकारी डॅनियल ऑडरर याला घटनास्थळी पाठवलं. अपघाताची पाहणी करून ऑडररने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवरून अपघाताची माहिती दिली. ही माहिती देत असताना त्यांच्या बॉडीकॅमने (पोलीस गणवेशावर लावलेला कॅमेरा) चित्रीत केलेला भाग तपास यंत्रणेसमोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये डॅनियल ऑडरर हसत असल्याचं ऐकू येतंय. हसत हसत तो म्हणाला, “ती केवळ २६ वर्षांची होती. असंही तिच्या आयुष्याची किंमत इतकीच होती.”

ज्या कारने जान्हवीला धडक दिली ती कार केव्हिन डव हा पोलीस कर्मचारी चालवत होता. अपघातानंतर ऑडररला तिथे पाठवण्यात आलं. त्यानंतर ऑडररने वरिष्ठ अधिकारी माइक सोलन यांना फोन केला. सोलन यांच्याशी बोलताना ऑडरर हसत होता. हसत हसत तो म्हणाला, तिच्या आयुष्याची किंमत इतकीच होती. ऑडररने फोनवर सांगितलं की ८० किमी प्रतितास इतक्या वेगाने केव्हिन कार चालवत होता, तेव्हा हा अपघात झाला. परंतु केव्हिन ११९ किमी प्रतितास इतक्या वेगाने कार चालवत होता, असं पोलीस तपासांत समोर आलं आहे.

हे ही वाचा >> रद्द केलेले कृषी कायदे मोदी सरकार परत आणणार? भाजपा नेत्याचा मोठा दावा; म्हणाले…

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यावर पोलीस आता पुन्हा एकदा या अपघाताचा गांभीर्याने तपास करत आहेत. सिएटल पोलीस कमिशनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे धक्कादायक आणि असंवेदनशील आहे. सिएटलचे लोक, पोलीस प्रशासनाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण व्हायला हवा. पोलिसांच्या चांगल्या वागणुकीने सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी.