पीटीआय, नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अन्य काही जणांविरुद्ध दाखल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस हिलाही आरोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयात या प्रकरणी एक पूरक आरोपपत्र किंवा खटला दाखल करण्याची विनंती करण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यानुसार जॅकलिनला आरोपी करण्यात येईल. या प्रकरणी ‘ईडी’ने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली आहे. जूनमध्ये तिची अखेरची चौकशी करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीलंकेची नागरिक असलेल्या जॅकलिनने २००९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. ईडीने एप्रिलमध्ये तिचा सात कोटी २७ लाखांचा निधी जप्त केला होता आणि ‘पीएमएलए’च्या तरतुदींतर्गत रोख १५ लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर ‘ईडी’ने एका निवेदनात स्पष्ट केले होते, की सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांतून मिळालेल्या रकमेतून जॅकलिन फर्नाडिसला पाच कोटी ७१ लाखांच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. आपली दीर्घकाळ असलेली साथीदार पिंकी इराणीद्वारे जॅकलिनला या भेटवस्तू वेळोवेळी दिल्या होत्या. या भेटवस्तूंव्यतिरिक्त चंद्रशेखरने गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून सहआरोपी अवतारसिंग कोचर यांच्यामार्फत फर्नाडिसच्या जवळच्या नातेवाईकांना एक लाख ७२ हजार ९१३ अमेरिकन डॉलर (सुमारे एक कोटी तीस लाख रुपये) आणि २६ हजार ७४० ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे १४ लाख रुपये) दिल्याचे सांगण्यात आले होते. कोचर आंतरराष्ट्रीय हवाला चालक आहे. ‘ईड़ी’च्या आरोपानुसार चंद्रशेखरने जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी हा अवैध निधी वापरला होते. हा पैसा त्याने ‘फोर्टिस हेल्थकेअर’चे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांच्यासह उच्चभ्रू व्यक्तींची फसवणूक करून गोळा केले होते.

दोन आरोपपत्रे दाखल

ईडी’ला तपासात असे आढळले होते, की चंद्रशेखर गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी अटक करेपर्यंत जॅकलिनच्या नियमित संपर्कात होता. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणीसह आठ जणांना अटक केली असून, दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत.