Jacqueline Fernandez granted interim bail : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जॅकलिन फर्नांडिसच्या स्टायलिस्ट लीपाक्षी इलावाडी यांची सुमारे आठ तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान लीपाक्षी इलावाडीने कबूल केलं की, तिला जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यातील संबंधांबद्दल माहिती होती, असा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.

हेही वाचा- “मी सुकेशबरोबर…” २०० कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी नोरा फतेहीचा खुलासा

जॅकलिन फर्नांडिस कोणत्या बँडचे कपडे परिधान करते? याची माहिती जाणून घेण्यासाठी आरोपी सुकेश चंद्रशेखर यांने लीपाक्षी इलावाडी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुकेश चंद्रशेखरला अटक करताच जॅकलिनने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले, अशी माहितीही इलावाडी यांनी पोलीस चौकशीत दिली आहे.