गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबईत ‘संविधान बचाव संमेलन’ कार्यक्रमात बोलताना मल्लिकार्जुन खर्गेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं होतं. भगवे कपडे परिधान करण्यावरूनही त्यांनी खोचक टीका केली होती. यावरून आता राजकीय वर्तुळाप्रमाणेच सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. जगदगुरू रामभद्राचार्यांनी यावरुन मल्लिकार्जुन खर्गेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खर्गे?

मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मल्लिकार्जुन खर्गेंनी योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. “एक कुणीतरी नेते साधूच्या वेशात राहतात. पण चांगले राजकारणी झाले आहेत. मुख्यमंत्रीही झाले आहेत. ते भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. डोक्यावर केसही ठेवत नाहीत. असे एक नेते आहेत, ज्यांना भाजपानं जन्माला घातलं आहे. ठीक आहे. आम्हाला त्याबाबत काही तक्रार नाही. माझं भाजपाला एवढंच म्हणणं आहे की एकतर त्यांना पांढरे कपडे परिधान करायला लावा. पण जर तुम्ही संन्याशांसारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल तर मग राजकारणातून बाहेर व्हा”, असं खर्गे म्हणाले होते.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

“तुम्ही भगवे कपडे परिधान करून राजकारणी होणार असाल तर मग त्या कपड्यांचं पावित्र्य काय राहिलं? एकीकडे तुम्ही भगव्या रंगाचे कपडे परिधान करता आणि दुसऱ्यांवर टीका करता. बटेंगे तो कटेंगे म्हणता. मग संन्याशासारखे कपडे का परिधान करता? तुमचं काम आहे सगळ्यांना एकत्र करणं, जोडणं, सगळ्यांशी प्रेमाने बोलणं. हे आरामात मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात आणि गरीबांबद्दल बोलतात. लोकांमध्ये विष पसरवण्याचं, तोडण्याचं काण करत आहेत. त्यामुळे यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे”, असंही खर्गेंनी यावेळी म्हटलं होतं.

Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!

रामभद्राचार्यांची खर्गेंच्या विधानावर टीका

दरम्यान, जगदगुरू रामभद्राचार्यांनी एएनआयशी बोलताना खर्गेंच्या विधानावर परखड टीका केली आहे. “असं कुठे म्हटलंय की भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्यांनी राजकारणात येऊ नये? मग काय गुंडांनी राजकारणात यावं का? भगवाधारींनी (भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्यांनी) राजकारण करायला हवं. भगवा रंग हा इश्वराचा रंग आहे. हाच भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र केलं होतं. भगवाधारीनेच राजकारण करायला हवं. सूट-बूट घालणाऱ्यांनी भारतात राजकारण करता कामा नये”, असं रामभद्राचार्य म्हणाले.

‘कटेंगे तो बटेंगे’ घोषणेचं समर्थन

दरम्यान, यावेळी रामभद्राचार्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ‘कटेंगे तो बटेंगे’ या घोषणेचं समर्थन देखील केलं. “हे खरं आहे. आपल्यात फूट पडता कामा नये. पंथ जरी अनेक असले, तरी हिंदुंनी मात्र एक व्हावं. जर आपण एक असू, तर कुणीही आपल्याला काहीही करू शकणार नाही. एक बोट कमकुवत असतं. पण पाच बोटांची मूठ शक्तिशाली असते”, असं जगदगुरी रामभद्राचार्य म्हणाले.

Story img Loader