* भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी जगदीश शेट्टरच भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार असतील, असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते व्हीडिओ कॉन्फरंसिंगने बंगळूरूतील सभेला संबोधित करत होते. दिल्लीहून बंगळूरला निघताना त्यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते सभेला पोहचू शकले नाहीत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचे नाव भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंफले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचे प्रचारप्रमुख असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राजनाथ सिंह यांच्या बरोबर लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते अरुण जेटलीसुद्धा या सभेला उपस्थित राहणार होते. बी.एस.येड्डीयूरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यंमत्री पदावरून काढून टाकल्यानंतर कर्नाटकात भाजपची प्रतिमा मलिन झाली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांचे नाव रोवले गेले नसते. तर नक्कीच मुख्यमंत्री पदाची त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली असती, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. 

Story img Loader