वायएसआर कॉंग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणातील आणखी एक आरोपी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले. सीबीआयच्या आरोपपत्रात नावे असलेले सर्वच आरोपी न्यायालयामध्ये आले होते.
गेल्या २५ सप्टेंबर रोजी सीबीआयने या खटल्याप्रकरणी जगनमोहन रेड्डी, श्रीनिवासन यांच्यासह इतर आरोपींवर सहावे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या सर्वांना एक नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार सर्व आरोपी न्यायालयात आले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्स कंपनीने जगनमोहन यांच्या मालकीच्या कंपनीमध्ये १४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात श्रीनिवासन यांच्या कंपनीला आंध्र प्रदेशातील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या सरकारकडून जमिनी आणि कृष्णा नदीतून पाणी उचलण्याची मंजुरी देण्यात आली होती, असा आरोप सीबीआयने श्रीनिवासन यांच्यावर ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा