जगनमोहन रेड्डी यांच्यावर असलेल्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपामध्ये सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात आंध्र प्रदेशमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री धर्माना प्रसाद राव आणि गृहमंत्री सबिथा इंद्रा रेड्डी यांचेही नाव आल्याने त्या दोघांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
धर्माना प्रसाद राव यांनी रविवारी रात्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सबिथा इंद्रा रेड्डी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सबिथा रेड्डी यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे किरणकुमार रेड्डी यांनी म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनीही सर्व निर्णय मुख्यमंत्र्यावरच सोपविला आहे. तरीही त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळालीये. सीबीआयच्या न्यायालयाने सबिथा यांना नोटीस बजावली असून, सात जून रोजी सुनावणीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा