Jagdeep Dhankhar Rau’s IAS Study Center : दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील RAU’S आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या राजधानीत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमधील कोचिंग सेंटर्समध्ये शिकणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला.

दरम्यान, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी कोचिंग सेंटर्सच्या व्यापारीकरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कुठलंही वर्तमानपत्र उघडल्यावर त्यामध्ये अशा कोचिंग सेंटर्सच्या कित्येक जाहिराती दिसतात. वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पानावर भल्या मोठ्या जाहिराती दिसतात. या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून? काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. कोचिंग सेंटर्स हा एक प्रकारचा मोठा धंदा झालाय. मुलं आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात आणि त्यांचे पालक या कोचिंग सेंटर्सवाल्यांना लाखो रुपये देतात.

Malad Mob Lynching CAse Update
Malad Mob Lynching : मालाडमध्ये जमावाच्या मारहाणीत मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओची पक्षाने घेतली दखल, नेते म्हणाले…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Dnyanradha Multistate Society, 1000 crores frozen,
ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या कार्यालयांवर ईडीचे छापे; मालमत्ता, रोख मिळून १ हजार कोटी गोठवले
mumbai crime branch to Investigate ncp taluka president s murder in byculla
राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाच्या हत्येचा तपास गुन्हेशाखेकडे
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Offensive post about Mahatma Gandhi on social media in buldhana
बुलढाणा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’! युवक सत्ताधारी पक्षाचा…
Chandrashekhar Bawankule organization,
बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, मविआ नेत्यांकडून भाजप लक्ष्य
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!

राजेंद्र नगरमधील घटना वेदना देणारी – धनखड

सभापती म्हणाले, “मी सभागृहातील सर्व सदस्यांकडे आग्रह करतो की प्रत्येकाने यावर उपाय सुचवा. आपल्या भारताला कुशल तरुणांची आवश्यकता आहे. मात्र हे कोचिंग सेंटर्सवाले लोक आपल्या तरुणांना एका मर्यादित साच्यात टाकू पाहतायत. राजधानीतील कोचिंग सेंटर्स एखाद्या गॅस चेंबरपेक्षा कमी नाहीत. राजेंद्र नगरमध्ये घडलेली घटना वेदना देणारी आहे.”

भाजपाचा हल्लाबोल

जुन्या राजेंद्र नगर भागात घडलेल्या या दुःखद घटनेवर आपत्कालीन चर्चा घेण्याच्या मागणीला सभापती धनखड यांनी सहमती दर्शवली. चर्चासत्र सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू सोडाच, त्यांच्या कपाळावर चिंतेची खुणही दिसली नाही. हा निव्वळ निष्काळजीपणा आहे.”

हे ही वाचा >> “तुम्हाला अपात्र का ठरवू नये?”, अजित पवार गटाला सरन्यायाधीशांचा सवाल; नोटीस बजावत मागितलं उत्तर

कोचिंग सेंटरचालकाकडून नियम धाब्यावर

खासदार त्रिवेदी म्हणाले, विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकदा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. एका विद्यार्थ्यांने २६ जून रोजी तक्रार केली होती. RAU’S IAS च्या तळघरात कुठल्याही परवानगीशिवाय, एनओसीशिवाय शिकवणी वर्ग चालू होते. ९ जुलै रोजी अग्निशमन विभागाने तळघरात स्टोरेज रूमसाठी एनओसी दिली होती. परंतु, तिथे शिकवणी चालू होती.