Jagdeep Dhankhar : मागील काही दिवसांपासून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन यांच्यात नावाच्या उल्लेखावरून वाद सुरू आहेत. या वादाचा आज दुसरा अंक बघायला मिळाला आहे. यावेळी सभापतींनी जया बच्चन यांना चांगलेच खडसावलं. यावेळी सभागृहात गदारोळदेखील बघायला मिळाला.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या तालिका सभापतींनी खासदार जया बच्चन यांचं नाव घेताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यावर जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझी स्वतंत्र ओळख असताना अभिताभ बच्चन यांचे नाव घेऊ नये, असे त्या म्हणाला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली. मात्र, त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे पीठासीन अधिकारी म्हणून काम करत होते. यावेळीसुद्धा जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच जया बच्चन आणि जगदीप धनखड यांच्या शाब्दिक युद्ध रंगले होते.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
Amitabh Bachchan
अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य

हेही वाचा – Jaya Bachchan : राज्यसभेच्या उपसभापतींनी अमिताभ बच्चन यांचं नाव घेताच खासदार जया बच्चन संतापल्या, नेमकं काय घडलं?

आज राज्यसभेत काय घडलं?

दरम्यान, आज पुन्हा एकदा राज्यसभेचे सभापती जगदीप घनखड यांनी जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला. यावर बोलताना, जया बच्चन यांनी पुन्हा आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे. मला इतरांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात, मला पण तुमचा बोलण्याचा टोन हा मान्य नाही. आपण सहकारी आहोत, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – चड्डी-बनियानमध्ये विमानात शिरलेल्या अर्शद वारसीला जया बच्चन जेव्हा झापतात…

राज्यसभेच्या सभापतींनी जया बच्चन यांना खडसावलं!

जया बच्चन यांच्या या प्रतिक्रियेनंतर सभापती जगदीप घनखड यांनीही त्यांना चांगलेच खडसावलं. तुम्ही अभिनय क्षेत्रात खूप नाव कमावलं आहे. आम्ही सर्व तुमचा आदर करतो. तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला ठरवत असतो. ज्या गोष्टी मी या खुर्चीत बसून बघू शकतो, त्या तुम्ही तिथे बसून बघू शकत नाही. मला दररोज हा वाद नको आहे. आता बास झालं. तुम्ही भलेही सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही, असे ते म्हणाले.