आपल्या अद्वितीय गायकीने गझलला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या जगजित सिंग यांचे भारतीय संगीताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी काढले. जगजित सिंग यांच्या जादूई आवाजाचा आजही लोकांवर प्रभाव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगजित सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
भारतीय संगीताच्या इतिहासावर आपली आपली अपूर्व मुद्रा उमटविणारे जगजित सिंग आज आपल्यात नसले, तरी त्यांचा जादूई आवाज आणि संगीताच्या रूपाने ते आपल्याला नेहमीच आनंद देत आहेत. त्यांनी शास्त्रीय, भक्तिगीते तसेच लोकसंगीतही गायले. मात्र गझलमुळे ते सर्वाधिक लक्षात राहतील.  
जगजित सिंग यांनी पाश्चात्त्य वाद्यांचा प्रयोग करून गझलला एक वेगळा बाज चढवला. गझल गायकीच्या या प्रदीर्घ वाटचालीत जगजित सिंग यांना त्यांच्या पत्नी चित्रा सिंग यांनीही तोलामोलाची साथ दिली. जगजित सिंग यांच्यासारखा कलाकार अनेक शतकांत एकदाच जन्माला येतो. ते आज हयात नसले तरी त्यांचे संगीत सदैव आपल्या हृदयात अमीट राहील, अशा या महान गायकाच्या नावे तिकीट काढल्याबद्दल पोस्ट खात्याचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा