रिलायन्स उद्योगाचे संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी, माजी राज्यपाल जगमोहन, अभिनेते अनुपम खेर व अजय देवगण आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना सोमवारी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी ५ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेल्या ५६ विख्यात व्यक्तींमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर, प्रख्यात नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती, माजी महालेखापाल विनोद राय, लोकगीत गायिका मालिनी अवस्थी, कृषी क्षेत्रातील ज्ञानी व्यक्तिमत्त्व सुभाष पालेकर आणि प्रख्यात शेफ मोहम्मद इम्तियाझ कुरेशी यांचा समावेश होता.
पती धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वीकारला. रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी व रिलायन्स एडीएचे अध्यक्ष अनिल अंबानी या दोन मुलांसह त्यांच्या कुटुंबातील निकट सदस्य यावेळी उपस्थित होते. अमेरिकेत स्थायिक अर्थतज्ज्ञ अविनाश दीक्षित, जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल जनमोहन, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रसारकर्त्यांपैकी एक असलेल्या यामिनी कृष्णमूर्ती व श्री श्री रविशंकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा