टाटा मोटार्स मालकीच्या जग्वार लॅन्ड रोव्हर(जेएलआर) कार उत्पादन कंपनीने आपली नवी ‘जग्वार एफ टाईप’ अत्याधुनिक स्पोर्ट्स कार बाजारात दाखल केली आहे. या कारची किंमत १.६१ कोटी रुपये इतकी असणार आहे. तसेच जग्वार एफ टाईप कारचे दोन प्रकार बाजारात दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार ‘एफ टाईफ व्ही८एस’ पाच लीटर पेट्रोल इंजिन कारची किंमत १.६१ कोटी तर, ‘एफ टाईप एस व्ही६’ तीन लीटर पेट्रोल इंजिन कार १.३७ कोटी रुपये असणार आहे.
“एफ टाईप कार बाजारात दाखल करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक कारनिर्मिती करणे ही जग्वार कंपनीची प्राथमिकता आणि खास गोष्ट आहे. या कारमुळे भारतात जग्वारचे ‘ब्रँड अपील’मध्ये वाढ होईल” असे जग्वार लॅन्ड रोव्हर इंडियाचे उपाध्यक्ष रोहीत सुरी यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader