किनारा रक्षक दलाचे डॉर्निअर विमान बेपत्ता झाले असतानाच आता भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान मंगळवारी सकाळी प्रशिक्षण उड्डाणावर असताना अलाहाबाद जिल्हय़ातील चाका भागात कोसळले. विमान कोसळण्याची ही वर्षांतील दुसरी घटना आहे. या अपघातात दोन्ही वैमानिक बचावले आहेत.  यापूर्वी मार्चमध्ये हरयाणात शहाबाद येथे जग्वार विमान शेतात कोसळले होते व त्या वेळीही वैमानिक सुखरूप बचावले होते.
चेन्नई : गेल्या आठवडय़ात भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान तीन वैमानिकांसह बेपत्ता झाले होते. त्याचा अद्याप शोध लागला नसून पंतप्रधान मोदींनी यामध्ये लक्ष घालावे व आपल्या वैमानिक पतीला शोधावे, अशा मदतीचे आवाहन या विमानातील बेपत्ता वैमानिक सुभाष सुरेश व एम. के. सोनी यांच्या पत्नींनी पंतप्रधानांना ट्विटरवरून केले आहे.

Story img Loader