Amritpal Singh Win Loksabha देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने लोकसभा निवडणूक लढवली होती. पंजाबमधील खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अमृतपाल सिंगने १ लाख ९७ हजार १२० मताधिक्याने विजय मिळवला आहे. खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अमृतपाल सिंग विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा अशी चुरशीची लढत झाली. अमृतपाल सिंगला एकूण ४ लाख ४ हजार ४३० मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा यांना २ लाख ७ हजार ३१० मतं मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली होती. अमृतपालच्या सहकाऱ्याला अटक केल्यामुळे पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंगवर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सध्या आसाममधील दिब्रुगढ येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हेही वाचा : VIDEO : निकालाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस नेते देवासमोर नतमस्तक, कुणाच्या पदरात यश पडणार?

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खदूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंह गिल विजयी झाले होते. यावेळी खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमृतपाल सिंग, काँग्रेसचे कुलबीर सिंह झिरा, अकाली दलचे विरसा सिंह वल्टोहा व आम आदमी पक्षाचे उमेदवार ललजीत सिंह भुल्लर यांच्यात लढत होत आहे. आसाममधील तुरुंगातून निवडणूक लढवणारा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग विजयी झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jailed pro khalistani separatist amritpal singh leads from khadoor sahib seat with over 50000 votes css