Jaipur Chemical Tanker Explosion : जयपूरमधील भानक्रोटा परिसरात अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटानंतर टँकरला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आज सकाळी (२० डिसेंबर) जयपूर-अजमेर महामार्गावर ही घटना घडली. तसेच या टँकरच्या शेजारी असणारे दुसरे काही वाहनेही जळून खाक झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. सध्या बचावकार्य सुरु असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना घडल्यानंतर जयपूर-अजमेर महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर एक केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला एका ट्रकने धडक दिली आणि त्यानंतर टँकरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan | 4 dead and several injured in a major accident and fire incident in the Bhankrota area.
— ANI (@ANI) December 20, 2024
A fire broke out due to the collision of many vehicles one after the other. Efforts are being made to douse the fire. pic.twitter.com/3WHwok5u8W
या स्फोटानंतर लागलेली आग काही क्षणात त्या ठिकाणी जवळ असलेल्या एका इंधन पंपापर्यंत पसरली. तसेच त्या पंपाच्या परिसरात उभी असलेली काही इतर वाहनेही जळून खाक झाले आहेत. यानंतर अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या टँकरचा स्फोटामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दृश्य व्हिडीओत दिसत आहे.
जयपुर-अजमेर राष्ट्रीय राजमार्ग पर गैस टैंकर में आग लगने की घटना में नागरिकों के हताहत होने का दुःखद समाचार सुनकर मन अत्यंत व्यथित है।
— Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) December 20, 2024
घटना की सूचना मिलते ही एसएमएस अस्पताल जाकर चिकित्सकों को तत्काल आवश्यक चिकित्सा सुविधाएं उपलब्ध कराने एवं घायलों की समुचित देखभाल हेतु निर्देशित… pic.twitter.com/bIpNI7xT7y
या घटनेसंदर्भात जयपूरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “आगीने अनेक काही वाहेने जळून खाक झाले आहेत. मात्र, या घटनेत किती वाहनांचा समावेश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.” तसेच केमिकलमुळे आग विझवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही घटनेची माहिती घेत आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशी चर्चा करून राजस्थानच्या आगीच्या घटनेची माहिती घेतली आहे.