Jaipur Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ राजपूत असं हत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून ही हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले होते. आता या हत्येच्या घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका महिलेने आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एका महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्या महिलेच्या पतीला लोखंडी पाईपने मारहाण करत त्याचे डोके फोडले व पती गंभीर जखमी झाल्यानंतर दोरीने गळा आवळून हत्या केली. तसेच यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घटना घडली?

जयपूर पोलिसांच्या माहितीनुसार, धन्नालाल सैनी हे भाजी विक्रेत्याचं काम करायचे. मात्र, त्यांच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती त्यांना समजली होती आणि त्यामुळे त्यांची पत्नी आणि त्यांच्यात वाद होत असायचा. मात्र, यामुळेच धन्नालाल सैनी यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीचा काटा काढला. दरम्यान, मृताची पत्नीचे एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या दीनदयाल नावाच्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते.

मात्र, काही दिवसांपूर्वी धन्नालाल यांना त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत कळलं होतं. यावरून या जोडप्यात जोरदार वाद झाला. त्यामुळे धन्नालाल यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने पतीला मारण्याचा कट रचला. त्यानंतर धन्नालाल यांना आधी लोखंडी पाईपने मारहाण करत त्यांचे डोके फोडले. या मारहाणीत ते गंभीर झाल्यानंतर धन्नालाल यांचा दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह एका पिशवीत भरून दोघांनी दुचाकीवरून एका निर्जनस्थळी नेला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळून टाकला.

दरम्यान, त्यानंतर महिला आणि प्रियकराने जयपूरहून पळून जाण्याचा कट रचला. या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक तात्काळ अटक केली. आता या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये ते एका दुचाकीवर मृतदेह घेऊन जात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या भयानक हत्येच्या घटनेनंतर आता राजस्थानातही अशीच घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Story img Loader