Jaisalmer Tubewell Water Burst Viral Video : राजस्थानच्या जैसलमेर येथील मोहनगड कालव्याच्या परिसरात सोमवारी बोअरवेलसाठी केल्या जाणाऱ्या ड्रिलिंग दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅस आणि पाणी बाहेर आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती, दरम्यान हा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

येथे बोअरवेलसाठी २८ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली ड्रिलिंग सुमारे ८५० फुट खोलपर्यंत गेल्यानंतर अचानक जमीन ढासळू लागली आणि प्रचंड दाबाने पाणी चार फुटांपर्यंत हवेत उडाले. उच्च दाबाने येणारा पाण्याचा हा फवारा पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. इतकेच नाही तर हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांना हा परिसर रिकामा करावा लागला. दरम्यान जमिनीतून बाहेर पडणार्‍या या पाण्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय…
The police also booked 10-15 people under various sections of Scheduled Castes and the Scheduled Tribes (File Photo)
Crime News : धर्मांतराच्या संशयावरुन दोन आदिवासी महिलांना खांबाला बांधून मारहाण, चौघांना अटक; नेमकी कुठे घडली घटना?
isro historical achievement
‘स्पेस डॉकिंग’च्या यशाकडे लक्ष, महत्त्वाच्या प्रयोगासह ‘इस्रो’ इतिहास घडविणार
Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
South Korean President Yoon suk yeol
द. कोरियाचे अध्यक्ष आणखी अडचणीत, ‘मार्शल लॉ’प्रकरणी न्यायालयाकडून वॉरंट जारी
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह नाथावत ( Pratap Singh Nathawat) यांनी सांगितले की, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गळती थांबवण्यात यश आले. दरम्यान त्यांनी लोकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

मोहनगडचे उप-तहसीलदार ललीत चरण यांनी सांगितले की, ही गळती रविवारी रात्री १० च्या सुमारास आपोआप बंद झाली. मात्र तज्ज्ञांच्या मते ती पुन्हा कधीही सुरू होऊ शकते, अशावेळी यामधून विषारी वायूसारखे हानिकारक घटकही बाहेर पडू शकतात. ओएनजीसी अधिकार्‍यांनी याची पाहाणी केली असून त्यांनी यामधून बाहेर पडणारे वायू विषारी किंवा ज्वलनशील नसल्याची माहिती दिल्याचेही चरण यांनी स्पष्ट केले. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

तज्ज्ञांनी काय सांगितले?

राजस्थान राज्य भूजल विभागाचे वरिष्ठ हायड्रो-जिओलॉजिस्ट डॉ नारायण दास इनाखिया यांनी या घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेला ‘आर्टेसियन स्थिती'(artesian condition) असे म्हटले जाते. वाळवंटी प्रदेशात सँड स्टोनच्या थराखाली बंद जागेत पाणी साठलेले असते. जेव्हा या २००-मीटर जाडीच्या खडकात ड्रिलिंग करताना हे पाणी लागते तेव्हा जास्त दाबामुळे ते वरच्या बाजूला फेकले जाते. मोहनगड आणि नाचना समिती पंचायतीच्या इतर भागात ही घटना दिसून आली आहे, परंतु या घटनेची तीव्रता पूर्वीपेक्षा जास्त होती.

दरम्यान जमिनीतून बाहेर पडणाऱ्या या पाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यादरम्यान या पाण्याचा संबंध पुरातन सरस्वती नदीशी असल्याचा दावा इनाखिया यांनी फेटाळला आहे. तसेच त्यांनी नमूद केले की याचे मूळ वेदपूर्व काळात तसेच लाखो वर्षे जुने असू शकते. तसेच अधिकार्‍यांनी पाण्याबरोबर बाहेर पडणारे वायू हे ज्वलनशील नाहीत आणि यापासून कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा>> राज ठाकरेंच्या नवीन वर्षानिमित्त ‘सूचक’ शुभेच्छा; म्हणाले, “माझं मंथन चालू आहे, लवकरच…

सुरुवातीला वेगाने बाहेर पडणारे पाणी हळूहळू कमी झाले. वाळवंटी प्रदेश असल्याने बरेचसे पाणी जमिनीत मुरले ज्यामुळे पूरासारखी स्थिती किंवा नुकसान झाले नाही. पण या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांनी खबरदारी उपाय योजना केली. .

Story img Loader