देशातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून भाजप नेते अरुण जेटली आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात अनेकवेळा राजकीय वितुष्ट निर्माण झाले असतील. परंतु, यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी अरुण जेटली यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
पंतप्रधानांच्या एकनिष्ठता नेहमी अबाधित राहीली. त्यांनी आपल्या ज्ञानी वृत्तीतून गेली दहा वर्षांच्या कालखंडात देशाचे नेतृत्व सांभाळण्यात अखंडत्व राखण्यात यश मिळविले. त्यांना सन्मानाने अलविदा करत असल्याचे अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे.
पंतप्रधान उत्तम वाचक आणि जिज्ञासू आहेत. गेली दहा वर्षे देशाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर त्यांनी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही ते जनमतात गुरूजनपदी आणि देशाचे नेतृत्व सांभाळणाची विश्वासार्हता असल्याच्या प्रतिमेचे म्हणून ओळखले जातील असे म्हटले आहे. यापुढील जीवन ते सन्मानाने जगतील यात काहीच शंका नाही असेही जेटली म्हणाले.
“विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना पंतप्रधानपदी विराजमान व्हावे लागले. सोनियांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या माघारीमुळे त्यांना पंतप्रधानपदाची धुरा सांभाळावी लागली. त्यामुळे सोनियांनी जाहीर केलेले पंतप्रधान या चौकटीतच त्यांना वावरावे लागले. जेव्हा ते देशाला मार्गदर्शन करत असत तेव्हा एक नेतृत्व म्हणून ते केव्हाच समोर आले नाहीत. ते राजकारणी व्यक्ती नाहीत. त्यांच्याकडे मर्यादीत अधिकार असल्याचीही जाणीव त्यांना होती.” असेही जेटली म्हणाले.
तसेच “एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करण्याची वेळ आल्यास आपल्या जिज्ञासू वृत्तीतून ते सामोरे जात असत आणि त्यांची कामाप्रती वैयक्तीक एकनिष्ठता वाखाणण्याजोगी होती या दोन उत्तम गुण त्यांच्यात आहेत.” असेही जेटली आपल्या ब्लॉगवर म्हणाले.

Story img Loader