जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे सुशील रिंकू विजयी झाले आहेत. या चौरंगी लढतीत ‘आप’ला काँग्रेसचं मोठं आवाहन होतं. काँग्रेसने या मतदारसंघात माजी खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या पत्नी करमजीत कौर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. संतोख सिंह चौधरी यांचं जानेवारी महिन्यात निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. आपने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. या पोटनिवडणुकीत आपच्या विजयामागची पाच कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गेल्या वर्षी पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजय मिळवला आहे. आपचं पंजाबमध्ये वर्चस्व वाढलं आहे. स्नानिकांना आकर्षित करतील अशा अनेक प्रकल्पांची घोषणा आपने पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी केल्या होत्या.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

आम आदमी पार्टीचा देशातला लोकप्रिय चेहरा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः जालंधरमध्ये प्रचार केला. त्यांच्या बरोबरीने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सुशील रिंकू यांचा जोरदार प्रचार केला. विधानसभा निवडणुकीला नुकतंच वर्ष झालं आहे, तर लोकसभा निवडणुकीला ११ महिने बाकी आहेत. मतदारांनी हे ११ महिने आम्हाला द्यावे, असं आवाहन केजरीवाल यांनी प्रचारावेळी मतदारांना केलं होतं.

निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले होते की, ‘आप’चे उमेदवार सुशील रिंकू विजयी झाल्यास ते आमच्या पक्षाचे लोकसभेतील पहिले खासदार असतील. यामुळे भगवंत मान यांनी लोकाना भावनिक केलं. त्याचा फायदा आपला झाल्याचं दिसत आहे.

पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी आपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. शून्य वीज बिल, आम आदमी दवाखाने यांची आठवण करून दिली. त्या दृष्टीने त्यांच्या पक्षाने सत्तेत आल्यावर केलेल्या कामांचा पाढा वाचला. ज्याचं रुपांतर मतदानात झाल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा >> Karnataka Assembly Election 2023 : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव; म्हणाले, “आम्ही…”

आपचे उमेदवार सुशील रिंकू यांचं दलित समाजात मोठं वजन आहे. त्यांना दलित मतदारांकडून जोरदार पाठिंबा मिळाला. ते अगदी क्षुल्लक बाबींमध्येही दलितांच्या बाजूने उभे राहतात. जालंधरमध्ये ४२ टक्के दलित लोकसंख्या आहे. त्यामुळे रिंकू यांचं पारडं आपोआप जड झालं.