Jamia Millia Islamia University : दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ कायम कोणत्या न कोणत्या मुद्यावरून चर्चेत असते. आता या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मंगळवारी रात्री राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिवाळीनिमित्त आयोजित रांगोळी कार्यक्रमांवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सांगितली जाते. यासंदर्भात काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी घोषणाबाजी करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच फुटेजमध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठा जमाव जमलेलाही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याच दिसून येत आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

हेही वाचा : PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

नेमके काय घडले?

वृत्तानुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात मंगळवारी रात्री दिवाळीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमावरून गोंधळ झाला. कार्यक्रम सुरू असताना काही विद्यार्थ्यांचा एक गट आला आणि त्यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. समोर आलेल्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट क्रमांक सातमध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास काही विद्यार्थी दिवे लावून कार्यक्रमाचे आयोजन करत होते. मात्र, दुसऱ्या एका गटातील काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे दोन गटात वाद सुरु झाली.

दोन गटातील वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि मोठा गोंधळ उडाला. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. हा सर्व गोंधळ जवळपास १ तास सुरू होता, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर काही वेळाने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि शांततेचं आवाहन केलं. दरम्यान, सध्या परिस्थिती निवळली असली तरी तणावाचे वातावरण आहे. मात्र, या घटनेनंतर विद्यापीठाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती सांगितली जाते. दरम्यान, याआधीही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यापीठात राडा झाल्याच्या घटनेमुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेत आले आहे.