जम्मू-काश्मीर सरकार लवकरच नवे पर्यटन धोरण जाहीर करणार असून त्यात राज्यात येणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन व पायाभूत सुविधांना प्राधान्य या बाबींवर भर दिला जाणार आहे.
जम्मू-काश्मीर पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक फारूख ए शहा यांनी सांगितले की, श्रीनगर येथे १६ मे रोजी तीन दिवसांचा पर्यटन प्रोत्साहन कार्यक्रम घेतला जाणार आहे त्यामुळे राज्यातील पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. युरोपातील व इतर देशातील प्रवासी आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. हा ग्रेट हिमालय बझार नावाचा कार्यक्रम नंतर दरवर्षी घेतला जाईल.
राज्य सरकार लवकरच पर्यटन धोरण जाहीर करणार असून त्यात पर्यटनाला चालना दिली जाईल. आमच्या राज्यात अवजड उद्योगांना वाव नाही त्यामुळे पर्यटन उद्योगावरच भर देणे भाग आहे. तीर्थयात्रा व पर्यटन अशा दोन्ही गोष्टींचा संगम येथे दिसून येतो असे त्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये पर्यटन उद्योग वाढवण्यात अनेक आव्हाने आहेत, पण सरकारच्या प्रयत्नांनी त्याला ऊर्जितावस्था मिळेल. मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद हे पर्यटन वाढवण्यात पुढाकार घेत आहेत. आता बॉलिवूडही राज्यात परत येत आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी २४ तास परवानगी असेल व त्याला चित्रपट निर्मात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. निसर्गसौंदर्य हा आमच्या राज्याचा एकमेव ठेवा असून आमच्याकडची ठिकाणे ही स्वीत्र्झलड व युरोपमधील काही ठिकाणांशी सहज स्पर्धा करण्याइतकी सुंदर आहेत. आता सरकार पर्यटनासाठी रोड शो करणार असून राज्यातील इतर भागातून पर्यटक येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’काश्मिरी पर्यटन-२०१४
’यात्रेकरू-  १.५ कोटी
’पर्यटक- १५ लाख

’काश्मिरी पर्यटन-२०१४
’यात्रेकरू-  १.५ कोटी
’पर्यटक- १५ लाख