जम्मू- काश्मीरमधील नौगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

नौगाममधील सुथू येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार रात्री उशीरा या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. बुधवारी पहाटे शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. नेमके किती दहशतवादी घटनास्थळी लपून बसले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा दलांनी परिसराला वेढले असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अजूनही चकमक सुरु आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीही दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Story img Loader