Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates 26 April 2025: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जल करारास स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, असे जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शुक्रवारी म्हटले.
तसेच पहलगाम दहशतवादी हल्लाच्या पाठी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे पुरावे भारताने आंतरराष्ट्री समुदायाला दिले आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे “इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर” पाकिस्तानातील किमान दोन ठिकाणी सापडले असल्याची माहिती भारताने परदेशी नेते आणि राजदूतांना दिली आहे. याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की, काही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यांच्या भूतकाळातील कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमधील सहभागाची पुष्टी केल्यानंतर ते पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान भारतीय लष्कर आणि तपास यंत्रणांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर देत पाच अतिरेक्यांचे घर स्फोटकांनी पाडले आहे.
Pahalgam Terror Attack Live Updates Today 26 April 2025 | पहलगाम दहशतवादी हल्लानंतरची कारवाई पाहा लाईव्ह अपडेट्स
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत झालेले संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
"पाकिस्तानसारख्या नरकात परतण्यापेक्षा भारतात मरण पत्करेन", परत जाण्याच्या भीतीने पाकिस्तानी हिंदू अस्वस्थ
Pahalgam Terror Attack Live Updates: ‘संरक्षण मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवू नका’, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी देशातील सर्व माध्यमांसाठी महत्त्वाची सूचना प्रसारित केली. पहलगाम हल्यानंतर भारतीय यंत्रणा, लष्कर यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. याबद्दलचे थेट प्रक्षेपण किंवा सैन्याच्या हालचालीबाबतच्या बातम्या देऊ नयेत, असे आवाहन माध्यमांना करण्यात आले आहे.
Pahalgam Terror Attack : विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तान दौरा ते पहलगाम हल्ला; दहशतवादी आदिल ठोकरबद्दल महत्त्वाची माहिती आली समोर
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शेअर केली १३व्या शतकातील पर्शियन कविता; म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान आमचे…"
Pahalgam Terror Attack Live Updates: ‘बांगलादेशला जाणारं गंगा नदीचं पाणी अडवा’, भाजपा खासदाराची मागणी
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानात जाणारे पाणी अडवले. यानंतर आता भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठे विधान केले आहे. "बांगलादेशही वळवळ करत आहे. त्यामुळे त्यांच्या देशात जाणाऱ्या गंगा नदीचे पाणी बंद करण्याची वेळ आली आहे. आमचे पाणी पिऊन पाकिस्तानचा राग गाणार असेल तर त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे", असे निशिकांत दुबे म्हणाले.
पहलगाम हल्ल्याच्या विरोधात आंदोलन होत असताना पाकिस्तानी अधिकाऱ्याचे संतापजनक कृत्य; व्हिडीओ होतोय व्हायरल
"हा चेष्टेचा विषय नाही, पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट संबंध कायमचे तोडा", पहलगाम हल्ल्यानंतर सौरव गांगुली संतापला
Pakistan: पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा थेट संबंध, जागतिक नेत्यांसमोर भारताने सादर केले पुरावे
Pahalgam Terror Attack Live Updates: 'पाकिस्तानात नका पाठवू, मी भारताची मुलगी', सीमा हैदर काय म्हणाली?
"माझा जन्म पाकिस्तानात झाला असला तरी मी आता भारताची मुलगी आहे. त्यामुळे मला पाकिस्तानात पाठवू नका", अशी विनंती २०२३ साली सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमा हैदरने केली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्याची हालचाल सुरू झाल्यानंतर सीमा हैदरलाही पाठविणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर सीमा हैदरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Pahalgam Terror Attack Live Updates: अखेर पाकिस्तान नरमला! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले महत्त्वाचे विधान…
पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याविरोधात प्रतिक्रिया देणाऱ्या पाकिस्तानने आता तटस्थ चौकशीसाठी तयारी दर्शविली आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा तांत्रिक पुरावा आणि विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचे भारताने सांगितल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तटस्थ चौकशीची तयारी दर्शविली आहे.
Pahalgam Terror Attack Live Updates: ‘कंगाल पाकिस्तानला युद्ध परवडणारच नाही’, भारताच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विधान
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक कोंडी केल्यामुळे चवतळालेला पाकिस्तान शस्त्रबंदीचे उल्लंघन करत आहे. मात्र त्यांच्याकडून अशीच छोटी-मोठी कारवाई होऊ शकते. ज्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पण कंगाल झालेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही, त्यांच्याकडे तेवढा शस्त्रसाठा नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराचे निवृत्त मेजर जनरल पीके सेहगल यांनी दिली.
Donald Trump on Pahalgam: भारत-पाकिस्तानमधील तणावाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे विधान; म्हणाले, "दीड हजार वर्षांपासून…"
पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचाच सहभाग? पुरावे आणि इतिहास काय सांगतो?
Pahalgam Terror Attack Live Updates: दहशतवाद्यांशी संबंधित तीन जणांची घरे जमीनदोस्त; पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ जिल्ह्यात कारवाई
दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांची घरे जमीनदोस्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ या जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
Pahalgam Terror Attack Live Updates: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या हल्यामागील सूत्रधार आणि हल्ला करणारे अतिरेकी यांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे
पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचाच सहभाग? पुरावे आणि इतिहास( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता काय सांगतो?