जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये दोन पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
Jammu and Kashmir: Terrorists attack a police party in Baramulla's Pattan. Two security personnel are injured in the incident. Further details awaited. pic.twitter.com/YD0nULoX7y
— ANI (@ANI) October 17, 2018
Jammu and Kashmir: Terrorists attack a police party in Baramulla's Pattan. Two security personnel are injured in the incident. Further details awaited. (Visuals deferred (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/8liI1SHjbW
— ANI (@ANI) October 17, 2018
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास बारामुल्लाच्या पट्टान परिसरात पोलिसांच्या पथकावर दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यापूर्वी आज सकाळीच श्रीनगर येथे सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. श्रीनगरमधील फातेह कादल परिसरात बुधवारी सकाळपासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याला वीरमरण आले. मृत दहशतवाद्यांमध्ये एक लष्कर ए तोयबाचा स्थानिक कमांडर असल्याचेही सांगण्यात येते. फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. सुरक्षादलाने परिसराला घेरल्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. परंतु, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने सैन्यदलाच्या प्रत्युत्तरात ३ दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाला. ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे अधिकारी इम्तियाज इस्माइल परे यांनी दिली.