Jammu and Kashmir: गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. अनेकदा दहशतवादी आणि भारतीय जवानामध्ये चकमकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन जवानाचं अपहरण केल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार करत सात जणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी काही स्थलांतरित नागरिकांवर रविवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात सात कामगारांना जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एका डॉक्टराचाही सहभाग आहे. तसेच या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्तही समोर येत आहे. दरम्यान, हे कामगार बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. काम करत असतानाच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातं.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
municipal administration sent stop work notice to developer in Kandivali for not complying with air pollution norms
पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी

या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी संध्याकाळी काही स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा हल्ला एका बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Yazidi Women: “लहान बाळाचं मांस खावं लागलं, त्याची चव…”, इसिसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव

प्राथमिक अहवालानुसार, हल्ले झालेले कामगार हे मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील गगनीरला सोनमर्गला जोडणाऱ्या झेड मोर बोगद्यावर काम करणाऱ्या बांधकाम टीमचा भाग होते. १८ ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका स्थलांतरित कामगाराची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा सात स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर स्थानिकांना या कामगारांचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केलेले मृतदेह आढळून आले. त्यानंतर ही माहिती सुरक्षा रक्षकांना देण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडता यावे, यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, “मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.”

अमित शाह यांचा कारवाईचा इशारा

“जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गंगानगीरमध्ये नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Story img Loader