Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन भारतीय जवानाचं अपहरण केल्याची घटना घडली होती. तसेच काही स्थलांतरीत कामगारांवर गोळीबार केल्याचीही घटना घडली होती. त्या घटनेत सात कामगारांचा मुत्यू झाला होता. या घटनानंतर दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे. असे असतानाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्याकडून गोळीबार करत कारवाई करण्यात येत असतानाच काही ट्रेकर्स यामध्ये अडकले. मात्र, सैनिकांनी लगेचच गोळीबार थांबवत सर्व ट्रेकर्स सुखरुप सुटका केली.

जम्मू काश्मीरच्या जबरवान हिल्समध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई दरम्यान चकमक सुरु होती. मात्र, यामध्ये काही ट्रेकर्स अडकले होते. या परिस्थितीत ट्रेकर्संनी १०० नंबर डायल करत पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांना आपल्या धोकादायक परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे वेळीच त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर लगेचच सैनिकांनी गोळीबार थांबवतत अडकलेल्या ट्रेकर्संची सुटका केली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
jammu Kashmir Kishtwar district encounter
Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा : “तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!

दरम्यान, यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या भागातील ट्रेकर्सना जंगलात किंवा आणखी कुठे ट्रेक करण्यासाठी जाण्याच्याआधी स्थानिक पोलिसांना कळवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या घटनेच ट्रेकर्स अडकल्याच्या संदर्भात माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु असताना दोन ट्रेकर्स एका डोंगराच्या परिसरात अडकल्याचं निदर्शनास आलं. मात्र, त्यांनी १०० नंबर वर डायल करून पोलिसांना या परिसरात ते अडकल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना कोणतीही हानी पोहोचण्यापूर्वी त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “ऑपरेशन सुरू झाले होते आणि त्यांनी (ट्रेकर्स) सुरुवातीच्या गोळीबाराचा आवाज ऐकताच ट्रेकर्संनी पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करत या संदर्भातील माहिती दिली. यानंतर नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिसांना कळवलं आणि माहिती पोहोचवण्यात आली. लष्कराने त्यांना वाचवण्यासाठी थोडावेळ गोळीबार थांबवला आणि त्यांची सुखरुप सुटका केली.”