Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.

डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या या चकमकीसंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

हेही वाचा : Imran Khan’s PTI Ban : कधीकाळी सत्तेत असलेल्या पक्षावरच आता बंदी येणार? पाकिस्तानात पीटीआयचं भवितव्य धोक्यात! पण कारण काय?

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात अद्यापही लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्यावतीने दहशतवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाई दरम्यान सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. दरम्यान, या परिसरात आता जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

कठुआमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सैदा या गावात काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला होता. दोन दहशतवादी सैदा या गावात घुसले होते. गावकर्‍यांनी दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना देताच त्यांनी गावात गोळीबार सुरू केला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. दरम्यान, आता जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी बसवर झाला होता हल्ला

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात ९ जून रोजी यात्रेकरूंना घेऊन जाणारी ५३ आसनी बस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळली होती. या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले होते. तर ३३ जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील काही भागात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत.