जम्मू काश्मिरमधील किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या जातीय दंगलीनंतर जम्म दौऱयावर गेलेले भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते अरूण जेटली यांना पोलिसांनी जम्मू विमानतळावर रोखून ठेवले आहे.
किश्तवाडमधील परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जेटलींना जम्मूमध्येच रोखण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर, यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून संताप व्यक्त करत, “किश्तवाडमधल्या दंगलीमागचे सत्य बाहेर येऊ नये यासाठी काँग्रेस सरकारने भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे विमानतळावर रोखून ठेवले आहे. हा लोकशाहीवर घाला आहे” असे म्हटले आहे.
ईदच्या नमाजानंतर काही लोकांनी देशविरोधी घोषणा केल्यामुळे किश्तवाडमध्ये हा संघर्ष पेटल्याचे सांगितले जात आहे. यासर्व पार्श्वभूमीवर घटनेचा निषेध म्हणून भाजपसह इतर काही संघटनांनी काल शनिवारी जम्मू-बंद पुकारला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा