Jammu Kashmir Elections 2024 3rd Phase Voting Live Updates : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज (१ ऑक्टोबर) तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या राज्यात याआधी दोन टप्प्यांमध्ये मतदान झालेलं आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स आणि इंजिनियर रशीद यांच्या नेतृत्वाखालील अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या पक्षांचे भवितव्य देखील ठरवण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या एकूण ४० जागांसाठी मतदान सुरू झालं आहे.
Jammu Kashmir Elections 2024 Phase 3 Live Voting Updates : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...
जम्मू काश्मीरमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान
तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात उधमपूरमध्ये सर्वाधिक मतदान चालू आहे. तर बारामुल्ला मतदानाच्या बाबतीत पिछाडीवर आहे.
बांदीपूर - ५३.०९ टक्के
बारामुल्ला - ४६.०९ टक्के
जम्मू - ५६.७४ टक्के
कठुआ - ६२.४३ टक्के
कुपवाडा - ५२.९८ टक्के
सांबा - ६३.२४ टक्के
उधमपूर - ६४.४३ टक्के
जम्मू काश्मीरमधील कठुआ विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवार संदीप मजोत्रा म्हणाले, "१० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे जम्मू काश्मीरमधील एक दशकापासून वंचित असलेल्या लोकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. या निवडणुकीमुळे कठुआमध्ये नवे बदल घडतील. लोकांना विकास व बदलाची संधी मिळणार आहे".
जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी दुपारपर्यंत झालेल्या मतदानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मला वाटतंय की सर्व काही सुरळीतपणे पार पडेल. मागील निवडणुकीच्या वेळी आम्ही जेव्हा या मैदानात उतरलो होतो, तेव्हा आम्ही सर्वात सशक्त विधानसभांपैकी एक निवडणूक लढत होतो. मात्र आज, जम्मू काश्मीरची विधानसभा देशातील सर्वात कमकुवत विधानसभांपैकी एक आहे. आम्हाला हे चित्र बदलायचं आहे. जनतेला हे चित्र बदलाचं आहे. त्यामुळे लोक भरभरून मतदान करतील".
दुपारी एक वाजेपर्यंत कठुआमध्ये ५०.०९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उधमपूरमध्ये सर्वाधिक ५१.६६ टक्के मतदान झालं आहे. तर बारामुल्ला भागात सर्वात कमी ३६.६० टक्के मतदान झालं आहे.
जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान चालू असून दुपारी एक वाजेपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यात सात जिल्ह्यांमधील ४० मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया चालू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २८.१२ टक्के मतदानाची नोंद जाली आहे. सांबा (३१.७८ टक्के) व उधमपूरमध्ये (३३.८४ टक्के) सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान चालू असून सकाळी ११ वाजेपर्यंत २८.१२ टक्के मतदान झालं आहे.
घराबाहेर पडून इंडिया आघाडीला मतदान करा, असं आवाहन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला केलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील ४० जागांवर मतदान चालू असून सकाळी ११ वाजेपर्यंत ११.०६ टक्के मतदान झालं आहे.
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आजाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बजावला मतदानाचा हक्क