काही दिवसांपूर्वीच अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी आणखी एक दुर्देवी प्रकार घडला. जम्मू-श्रीनगर महामार्गावर रामबाण येथे शनिवारी अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली. यामध्ये ११ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. यापैकी १९ जणांना एअर अॅम्ब्ल्युन्सने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर नऊ जण अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.
रामबाण जिल्ह्यातील बनिहाल लगतच्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाल करत मदत व बचावकार्य सुरू केले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यापैकी किती जण जखमी झाले आहेत, याची नेमकी माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी सध्या बचावकार्याला सुरूवात केली आहे.
Extremely pained by loss of lives of Amarnath Yatris due to bus accident in J&K. My thoughts with families of the deceased:PM Modi(File pic) pic.twitter.com/xVa7QcJDiF
— ANI (@ANI_news) July 16, 2017
J&K: Bus met with an accident on Jammu -Srinagar highway; rescue operation underway, more details awaited
— ANI (@ANI_news) July 16, 2017
#UPDATE: 11 dead after a bus carrying Amarnath Yatra pilgrims fell off the road on Jammu-Srinagar highway; rescue operation by Army underway
— ANI (@ANI_news) July 16, 2017
11 dead after a bus carrying Amarnath Yatra pilgrims fell off the road on Jammu-Srinagar highway; rescue operation by Army underway pic.twitter.com/LHJdcJsOMc
— ANI (@ANI_news) July 16, 2017
#WATCH: Rescue operation by Army underway as bus carrying Amarnath Yatra pilgrims fell off road on Jammu-Srinagar highway in Ramban, 11 dead pic.twitter.com/f1anBmdtdd
— ANI (@ANI_news) July 16, 2017
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून, ३२ लोक जखमी झाले होते. जखमींपैकी एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे या हल्ल्यातील मृतांची संख्या आठवर पोहचली आहे. अमरनाथ यात्रेकरू ज्या बसमधून परतत होते त्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान बसचा एक टायर पंक्चर झाला होता, तरीही बसचालक सलीम आणि बसचे मालक हर्ष यांनी धाडस आणि समयसूचकता दाखवत ते न थांबता बस चालवत राहिले. जर सलीमने हल्लेखोरांना घाबरून बस थांबवली असती तर अनेक लोकांचे प्राण गेले असते.