२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. रामलल्लाचं आगमन होतं आहे त्यामुळे सगळा देश राममय झाला आहे. २२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. अशात कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत फारुख अब्दुल्लांनी रामाचं भजन म्हटलं आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हे म्हटलं की रामाच्या वडिलांनी म्हणजेच दशरथांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला वचन दिलं होतं. दशरथ राजांनी त्यांचं वचन पूर्ण केलं. रामाने त्यांचा विरोध केला नाही असं फारुख अब्दुल्लांनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी रामाचं भजन म्हटलं आहे. मेरे राम.. या नावाने हे भजन आहे. कपिल सिब्बल यांनी फारुक अब्दुल्ला यांची एक मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी हे भजन म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

कलम ३७० बाबत काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

१९२७ मध्ये महाराज हरी सिंग यांनी कायदा आणला होता. त्यावेळी हिंदुस्थान पाकिस्तान नव्हता. १९२७ मध्ये त्यांनी जमीन व्यवहार काश्मीर बाहेर कुणी करु नये आणि नोकरी काश्मिरी तरुणांनाच मिळतील असं त्यांनी कायद्यात म्हटलं होतं. ३७० कलमात याच गोष्टी होत्या. मात्र केंद्र सरकारने हे कलम रद्द केलं असं काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. आम्हाला आमचे हक्कही दिले गेलेले नाहीत असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

वाजपेयी माणुसकी जपणारे होते

वाजपेयींच्या काळात मी काम केलं आहे. त्यांच्यात माणुसकी होती. एकदा मला वाजपेयी म्हणाले होते की भारत त्याचवेळी प्रगती करु शकतो जेव्हा सगळे धर्म एकत्र नांदतील. आज तोच भारत धर्मांमध्ये विभागला जातो आहे. मात्र भारत हा देश आपल्या सगळ्यांचा आहे. वाजपेयी हे पाकिस्तानातही गेले होते. त्यांनी नवाज शरीफ यांना वाद मिटवण्यासंदर्भातलं आवाहन केलं होतं. कपिल सिब्बल यांनी ‘द वायर’साठी फारुख अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही याच मुलाखतीत त्यांनी रामाचं भजनही म्हटलं आहे.

Story img Loader