Pahalgam Terror Attack Live Updates Today: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांच्या एका गटानं अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये आत्तापर्यंत २५ हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात डोंबिवलीच्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय, सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांवर या हल्ल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates Today : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध

12:10 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याचा काश्मिरातील इतर पर्यटकांनाही फटका…, श्रीनगर – जम्मू प्रवासासाठी २० तास!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १ ए बंद करण्यात आल्यामुळे जम्मूच्या दिशेने जाणारी सर्वच वाहने मुघल रोडमार्गे रवाना होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. …वाचा सविस्तर
11:41 (IST) 23 Apr 2025

दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली, संरक्षण मंत्री भारतावरच आरोप करत म्हणाले…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानने दिलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप केला आहे.

11:17 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!

WorldWide Reaction on Jammu and Kashmir Terror Attack Updates : या भ्याड हल्ल्याचा भारतीयांनी तीव्र निषेध केलेला असताना जगभरातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून याप्रकरणी भारतासोबत असल्याची प्रतिक्रिया व्यक्तकेली आहे. …अधिक वाचा
10:30 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली, भारतावर आरोप करत संरक्षण मंत्री म्हणाले…

Jammu and Kashmir Terror Attack Updates : सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे. …सविस्तर बातमी
10:13 (IST) 23 Apr 2025

“मोदी सरकारने लष्करातील २ लाख पदं न भरल्यामुळे पहलगामध्ये सुरक्षारक्षक नव्हते”, राऊतांकडून गंभीर आरोप

संजय राऊत म्हणाले, अमित शाहांसाठी शेकडो सशस्त्र जवान श्रीनगरमध्ये होते, मात्र सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नव्हता. हे सगळं का झालं? कारण मोदी सरकारने भारतीय सैन्यदलातील दोन लाख रिक्त पदे भरलेली नाहीत. संरक्षण विभागाच्या बजेटमध्ये त्यांनी कपात केली आहे. संरक्षण विभागासाठी वापरले जाणारे पैसे मोदी सरकारने लाडली बहन योजनेसारख्या लोकांना थेट पैसे देणाऱ्या योजनांवर वळवले आहेत. असं करून हे मोदी सरकार आपल्या सर्वांच्या सुरक्षेशी खेळतंय.

10:08 (IST) 23 Apr 2025

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारची : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशभरातील पर्यटकांना त्यांनी ठार मारलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते. मोदी सरकारने काश्मीरवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्यासाठी काश्मीरचं कलम ३७० हटवलं, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं. त्यामुळे काल पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे.

09:57 (IST) 23 Apr 2025

“माझ्या पतीला डोक्यात गोळी लागली, काय घडतंय आम्हाला कळलंच नाही”, पहलगाम हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांचं धक्कादायक अनुभवकथन!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये देशाच्या विविध भागातून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. …सविस्तर बातमी
09:23 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : “हॉटेल्स अन् फ्लाईट बुकिंग रद्द करा”, नियोजित दौरे रद्द करण्यासाठी पर्यटकांकडून ट्रॅव्हल एजंट्सना फोन

Jammu and Kashmir Terror Attack Updates : “उद्या नियोजित १० टूरपैकी सात टूर आधीच रद्द करण्यात आले आहेत,” असे हँगआउट हॉलिडेज काश्मीर चालवणारे ३६ वर्षीय फुरकान बशीर म्हणाले. …सविस्तर बातमी
08:51 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र पडसाद

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र पडसाद, अनेक भागांत जाळपोळ; शाळा, महाविद्यालये आणि रस्त्यावरची वाहतूक बंद

08:21 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates: “दहशतवादी जवळपास २० मिनिटं बंदुका घेऊन फिरत होते, तुफान गोळीबार चालू होता”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव!

Jammu and Kashmir Terror Attack Updates: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं? …अधिक वाचा
08:08 (IST) 23 Apr 2025

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन टेकड्यांवरील घनदाट जंगलाने वेढलेल्या प्रशस्त मैदानात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना, अचानक दहशतवाद्यांनी या टेकड्यांवरील मैदानात पोलिसी वेशात मंगळवारी दुपारी प्रवेश केला. …अधिक वाचा
07:57 (IST) 23 Apr 2025

PM Modi meets NSA: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत बैठक

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्ट्र मंत्र्यांची भेट, पहलगाम हल्ल्यासंदर्भात उच्चस्तरीय चर्चा; केंद्र सरकारकडून काय पावलं उचलली जाणार?

07:42 (IST) 23 Apr 2025

Raj Thackeray on Pahalgam Terror Attack: “केंद्रानं इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून…”, राज ठाकरेंचं मोदी सरकारला आवाहन!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे… केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी…. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

07:34 (IST) 23 Apr 2025

Rahul Gandhi on Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह व जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बोललो. तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा पूर्ण पाठिंबा मिळणं आवश्यक आहे.

07:22 (IST) 23 Apr 2025

High Alert in UP: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट

उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर, पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांचे उत्तर प्रदेश पोलिसांना आदेश, नेपाळला लागून असलेल्या सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!

07:19 (IST) 23 Apr 2025

J&K Terror Attacke Live Updates: श्रीनगरमध्ये बंदसदृश्य स्थिती

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस पडल्याचं दिसून येत असून अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगर बंदची हाक दिली आहे.

07:16 (IST) 23 Apr 2025
J&K Terror Attacke Live Updates: आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही – श्री श्री रवी शंकर

त्या दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सगळ्या जगानं एकत्र यायला हवं. प्रत्येक व्यक्ती या हल्ल्याचा निषेध करेल. पण आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही. काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या दहशतवादी मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. जिथे कुठे अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं तिथे कारवाई करायला हवी. निरपराध लोकांना दहशतवाद्यांच्या या अमानवी कृत्यातून लक्ष्य करण्यात आलं आहे. आम्ही हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत – श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरू

06:58 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack live Updates: एअर इंडियाकडून अतिरिक्त विमान सेवा

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमवीर एअर इंडियाकडून श्रीनगरहून दोन अतिरिक्त विमान सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, तिकीट रद्द करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली असून त्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच, ज्या प्रवाशांना काश्मीरमधून आपल्या घरी परत यायचं असेल, त्यांना प्रवासाची वेळ बदलून एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने परतण्याचीही मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

06:55 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack live Updates: मोदींची सौदीच्या प्रिन्सशी हल्ल्यावर चर्चा

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेण्याआधी सौदीच्या प्रिन्सशी सविस्तर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

06:53 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack live Updates: पंतप्रधान मौदी सौदीचा दौरा सोडून परतले

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमवीर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्थवट सोडून भारतात परतले आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.

J&K Terror Attack in Pahalgam Live Updates Today: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध