जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपियाँ सेक्टर येथील शेरमल या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. शमशूल हक, आमिर सुशील भट आणि शोएब अहमद शाह अशी ठार करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. हे तिघेही पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेले दहशतवादी होते असेही स्पष्ट होते. तसेच हे तिघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते असेही पोलिसांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधी शुक्रवारी म्हणजेच 18 जानेवारीला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर दोन ग्रेनेड हल्ले के होते. पहिला हल्ला लाल चौक तर दुसरा हल्ला श्रीनगरमध्ये करण्यात आला. श्रीनगरमध्ये झीरो ब्रिजवर असलेल्या पोलिसांच्या दिशेने ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले. आता आज झालेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या कुरापतींना जशास तसे उत्तर मिळते आहे हेच या प्रत्युत्तावरून स्पष्ट झाले आहे.

Story img Loader