जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून कारवाईचा वेग वाढला असून चकमकींच्या पलीकडे जात सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करणं, कथित फंडिंग नेटवर्क तोडण्यासाठी अंमलबजावणी आणि कर छापे तसंच ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) नेटवर्क आणि त्यांच्या संबंधांवर कारवाई याकडे लक्ष दिलं जात असल्याचं दिसत आहे.

गेल्या चार वर्षांच्या डेटाच्या अभ्यासातून या क्षेत्रांमध्ये यूएपीए आणि पीएसए यांचा वापर वाढल्याचं दिसत आहे. २०१९ पासून जम्मू काश्मीर पोलिसांनी ओव्हर ग्राउंड वर्करचं (OGW) नेटवर्क तोडलं असून यातूनच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या १९०० जणांना अटक करण्यात आली आहे.

Samsung Strike
Samsung Strike : हजारो सॅमसंग कर्मचाऱ्यांचा महिनाभरापासून संप; अनेक बैठका निष्फळ, मागण्या मान्य करण्यास सरकार का ठरतंय अपयशी?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
Badlapur Crime News
Badlapur : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शाळा संचालक आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, उच्च न्यायालयाचा निर्णय
Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
Israeli attacks hitting all areas of Lebanon
हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?

केंद्रशासित प्रदेशाने एकत्र केलेल्या लष्कराच्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये २०२० आणि २०२१ मध्ये १९५ टेरर मॉड्यूल आणि ३५ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर लक्ष दिलं जात होतं, पण आता प्रभावी रणनीतीने संपूर्ण दहशतवाद संरचनेवर लक्ष दिले पाहिजे. हे केवळ संपूर्ण नेटवर्कच्या “प्रभावी कार्यवाही” द्वारे केलं जाऊ शकतं, यासाठी त्यांची माहिती, लॉजिस्टिक, निधी किंवा इतर गोष्टींची मदत घ्यावी लागेल”.

जम्मू काश्मीरमध्ये युपीएए आणि पीएसए अंतर्गत कारवाईचं प्रमाण वाढलं असून २०१९ ते २०२१ दरम्यान युपीएए अंतर्गत खटल्यांची संख्या ४३७ (२०१९) वरून २०२० मध्ये ५५७ पर्यंत वाढली आणि २०२१ मध्ये ती ५०० पेक्षा कमी झाली. गेल्या तीन वर्षांत या प्रकरणांतर्गत गुन्हा दाखल झालेल्यांची संख्या २७०० पेक्षा जास्त आहे. यामधील अर्ध्याहून जास्त जण (१३६२) कोठडीत आहेत.

अधिकृत नोंदीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये १६९ दहशतवादी सक्रीय असून यामधील १६३ जण खोऱ्यात आहेत. २०२१ मध्ये दहशतवाद्यांमध्ये सामील झालेल्या १३४ जणांपैकी ७२ जणांना वेगवेगळ्या कारवाईत ठार करण्यात आलं. यामधील २२ जणांना अटक केली तर ४० जण अजून अॅक्टिव्ह आहेत.

दरम्यान २०२१ मध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील २० आणि सुरक्षा यंत्रणांचे २३ जवान दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झाले.

२०२१ मध्ये सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईचा सर्वात मोठा फटका जैश-ए-मोहम्मदला बसला असून त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीचा क्रमांक आहे. सीमापार करणाऱ्यांची संख्याही २०२१ मध्ये कमी झाली आहे. ७३ जणांनी सीमा पार करण्याचा प्रयत्न केला असून यामधील ३४ जणांना यश आलं. २०२० मध्ये हा आकडा ९९ आणि ५१ होता.