सोमवारी पाकिस्तान दिनाच्या दिवशी पाकिस्तानचा झेंडा फडकाविल्याच्या कथित प्रकरणावरून ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ची प्रमुख आसिया अंद्राबीच्या विरोधात बेकायदा कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंद्राबीच्या विरोधात बेकायदा कृत्याबाबतच्या कलम १३ अंतर्गत नौहट्टा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरेकी नेत्यांनी सोमवारी पाकिस्तानचा झेंडा फडकाविल्याच्या कथित प्रकरणाचा तपास सुरू आहे. आसियाला अटक होणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना या प्रकरणी पुढील कारवाई नियमाप्रमाणेच होईल, असे पोलीस अधिकारी म्हणाला. २३ मार्च रोजी आसियाने पाकिस्तानचा झेंडा फडकावून पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या सर्व प्रकरणावरून एकच वादळ उठले.
आणखी वाचा