Jammu-Kashmir Terrorist : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येते. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात सर्च मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील हलकन गली येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांची चकमक सातत्याने सुरू असून अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. याआधीही श्रीनगरच्या खन्यारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. दरम्यान, एका घरात दोन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तचर माहितीच्या आधारे मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू

सुरक्षा दल संशयास्पद भागात पोहोचताच त्या ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर लष्कराच्या जवानांकडूनही तशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शांगुस-लार्नू भागातील हलकनजवळ ही चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, श्रीनगरच्या खन्यारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबाराची चकमक सुरु होती. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कधी लष्करी जवानांना तर कधी स्थलांतरित मजुरांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे सध्या सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सतत शोध मोहीम राबवत आहे. दहशतवादी अनेकदा घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले आढळून येतात. त्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दल हाणून पाडत आहेत. श्रीनगरच्या खन्यार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. या चकमकीत गोळीबारामध्ये एका घरालाही आग लागल्याची घटना समोर आली आहे.

गांदरबलमध्येही दहशतवादी हल्ला झाला होता

गांदरबलमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सात कामगारांना जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एका डॉक्टराचाही सहभाग होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले होते. हे कामगार बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. काम करत असतानाच हा हल्ला होता. त्याआधी दहशतवाद्यांनी दोन जवानांचं अपहरण केलं होतं. त्यामध्ये एक जवान पळून जाण्यास यशस्वी झाला होता. मात्र, त्यानंतर एका जवानाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir terrorist news major army operation in jammu and kashmir anantnag two terrorists killed gkt