Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा या ठिकाणी आज (४ जानेवारी) लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा या ठिकाणी सैनिकांना घेऊन जात असलेला लष्कराचा ट्रक रस्त्यावरून अचानक घसरला आणि दरीत कोसळला. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात जखमी झालेल्या जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची माहिती देताना म्हटलं की, “लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरलं आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ खोल दरीत हा ट्रक कोसळला. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जवान जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
#Bandipora pic.twitter.com/9OE5ZSRaaJ
— NOORUL JAMAL (@Ask_NJR) January 4, 2025
जम्मू-काश्मीरमधील एसके पायनजवळ वळण घेण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराच्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
#UPDATE | J&K | "Today while performing duty in Bandipora District, a vehicle of the Indian Army skidded and fell into the gorge due to inclement weather and poor visibility conditions. Tragically three Bravehearts lost their lives in the unfortunate accident…," tweets Chinar… https://t.co/8RBwynIEvt pic.twitter.com/OitXWBKVEw
— ANI (@ANI) January 4, 2025
दरम्यान, लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. २४ डिसेंबर २०२४ रोजी पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन उलटून ३५० फूट खोल दरीत कोसळले होते. या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच पाच जण जखमी झाले होते. तसेच त्याआधी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी राजौरी जिल्ह्यात एका लष्करी जवानाचा मृत्यू झाला होता. तेव्हाही लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळले होते. यानंतर आजही अशाच प्रकारची घटना घडली आहे.