अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग गुजरातच्या जामनगरमध्ये रंगतं आहे. त्यामुळेच या विमानतळाला आता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर हे विमानतळ खास पद्धतीने सजवण्यात आलं आहे. भारतातले प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजेच अनंत अंबानींचं लग्न होणार असल्याने जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे.
अनंत अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी व्हिआयपी येणार
अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यासाठी बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग , इव्हांका ट्रम्प तसंच विविध देशांचे माजी पंतप्रधान यांच्यासह देशातलेही महत्त्वाचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच जामनगर या विमानतळाला १० दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. प्री वेडिंग सोहळा १ मार्च रोजी सुरु झाला आहे. ‘द हिंदू’ ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा असल्याने २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत जामनगर विमानतळाला आंतरष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत हे आंतरराष्ट्रीय दर्जा असलेलं विमानतळ असणार आहे अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. त्याअनुषंगाने या विमानतळावर कस्टम, इमिग्रेशन आणि क्वारंटाईन सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जामनगर हे संरक्षण दलासाठीचं विमानतळ आहे. मात्र या ठिकाणी व्यावसायिक उड्डाणांना संमती देण्यात आलेली आहे. आता या विमानतळाला दहा दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाही देण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगही उभारली आहे. या विमानतळामध्ये फाल्कन २०० सारखी सहा लहान विमानं किंवा एअरबस ए ३२० सारखी तीन मोठी विमानं मावतात. शुक्रवारी अरायव्हल आणि डिपार्चर मिळून १४० उड्डाणे अपेक्षित होती असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १ मार्च २०२४ ते ३ मार्च २०२४ असे जवळपास तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. बॉलीवूडमधीलही अनेक कलाकार अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
व्हीआयपी पाहुण्यांसाठी खास सोय
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यत तयारीही करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी पाहुण्यांसाठी अल्ट्रा लक्झरी टेन्ट (तंबू) उभारण्यात आले आहेत. या तंबूमध्ये सोफा, बेड, फ्रीज, टीव्हीपासून, एसीपर्यंतच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहे