Jamsetji Tata 184th birth anniversary: जमशेदजी नसरवानजी टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक आहेत. १८६८ मध्ये त्यांनी मुंबईमध्ये स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या कंपनीद्वारे टाटा समूहाच्या उदयाची सुरुवात झाली. पुढे काही वर्षांनी जमशेदजी टाटा यांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश करत टाटा समूहाची व्याप्ती वाढवली. आज जगभरामध्ये हा समूह पसरलेला आहे. जमशेदजींच्या या प्रयत्नांमुळे देशातील असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांनी केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे ३ मार्च रोजी टाटा समूहामध्ये ‘संस्थापक दिवस’ साजरा केला जातो. याची सुरुवात १९३२ मध्ये झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज (३ मार्च) जमशेदजी टाटांची १८४ वी जयंती आहे. या निमित्ताने जमशेदपूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्युबिली पार्कसह शहरातील मुख्य ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संस्थापक दिनाची यंदाची थीम ‘Greenovation Make Tomorrow Green’ ही आहे. या थीमनुसार संपूर्ण शहराला सजवण्यात आले आहे. पर्यावरणाशी निगडीत जागरुकता पसरवण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांद्वारे जमशेदपूरमध्ये मागच्या एका वर्षामध्ये ५० पेक्षा जास्त सार्वजनिक उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. टाटा स्टीलचे चेअरमन नोएल टाटा यांच्यासह टाटा समूहातील मोठमोठे अधिकारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा – जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वात दानशूर व्यक्ती, बिल गेट्स यांना ही टाकले मागे

नोएल टाटा यांच्या हस्ते कीनन स्टेडिअमजवळील करोना व्हॉरियर्स पार्क, जमशेदपूर नॅचरल पार्क आणि जुबिली पार्क या उद्यानांचे उद्घाटन केले जाणार आहे. शहरामध्ये केलेली ही विद्युत रोषणाई आणखी काही दिवस असणार आहे. सकाळच्या कार्यक्रमामध्ये नोएल टाटा व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधणार आहेत.