रविवारी देशभरात सकाळी ७ वाजल्यापासूल जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. हा कर्फ्यू रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या काळात तुम्ही काय करू शकता, याचा सल्ला योगगुरू रामदेव बाबांनी दिला आहे.
अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं.
रामदेव बाबा यांनी यासंदर्भात एक टि्वट केलंय. त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प आपण सारे पूर्ण करून दाखवूया. भारताला करोनापासून वाचवूया. सर्वांनी घरी स्वाध्याय करा. योग करा. काही आसनं करा. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. याशिवाय घरी बसून सत्संगही करा. पण, बारे येऊ नका. घरातच राहा.
हम सब मिलकरके @narendramodi जी के संकल्प को पूरा करके दिखाएंगे,
भारत को #Corona से बचाएंगे.
साधना,सावधानी,संयम, संकल्प।
सभी लोग घर पर स्वाध्याय, योग,आसन,प्राणायाम,ध्यान,
सत्संग करें।
-बाहर नही,अंदर जाइये।#JantaCurfewMarch22 https://t.co/ggtYnjcIXF pic.twitter.com/vDbZmBKwwC— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) March 22, 2020
संयम आणि संकल्पानं करोनावर मात करू -पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सकाळी कर्फ्यूला सुरूवात झाली असून, मोदी यांनी पहाटेच ट्विट करून यात सर्वांनी सहभागी होण्याच आवाहन केलं आहे. ‘जनता कर्फ्यू सुरू होत आहे. मी विनंती करतो की, सर्व नागरिकांनी या देशव्यापी अभियानात सहभागी होऊन करोनाविरोधातील ही लढाई यशस्वी करावी. आपला संयम आणि निर्धार या आजाराला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.